घास विचारांचा...
घास विचारांचा...


भुकेल्यास माणुसकीचा
द्यावा घासातील घास
आपुलकीचा सर्वांसाठी
असावा हृदयी निवास...
आधार निराधारांचा
घास समाजभानाचा
सत्कर्माचा घेऊन वसा
द्यावा संदेश एकतेचा...
घास एक आत्मीयतेचा
पशु-पक्ष्यांशी मित्रता
वाढविण्यास सन्मान
जाणून मूल्य बंधुता...
बदलाची धरून कास
ध्यास सकारात्मकतेचा
एकमेकांप्रती कर्तव्याचा
द्यावा घास विचारांचा...