माझा भारत
माझा भारत
माझा भारत देश हा
विविधतेने नटलेला देश हा
या देशाच्या कानाकोपऱ्यात विविध भाषांचा मेळ घालूया
विविध अन्नपदार्थाची चव चाखूया
माझ्या या भारत देशाची सुंदर सफर करूया
प्रत्येक राज्याची नवीन ओळख घेऊनी वाटचाल करुया
एकात्मता, एकजुटीने राहूया सगळे मिळून
अबोला न धरता जाऊया सगळ्यांना मदतीचा हात पुढे करून
विविध धर्म, विविध जाती विविधतेने नटलेला देश हा
परंतु माणुसकीने पिढ्यानपिढ्या अंगिकारलेल्या लोकांचा देश हा
लोकशाही ही या भारत देशाची सर्वोत्तम ओळख
आग्र्याचा प्रेमाचा प्रतिक ताजमहाल जगाच्या कानाकोपऱ्यात असलेली शान
बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान
हेच आहे या देशाचे सर्वोच्च विधान
म्हणूनी अशा या भारत देशाचा मला वाटतो खूप अभिमान
अशा या देशात जगते मी घेऊनी माझा स्वाभिमान
गाठायचे आहे मला खूप मोठे यशाचे सर्वोत्तम शिखर
त्यासाठी करते मी यशस्वी प्रयत्न ठेऊनी जिगर
ऊंचवावी मान या देशाची
प्रयत्नांची पराकाष्ठा करुनी
जन्म घेतला या देशाच्या मातीत ऋण कसे हे फेडावे
परत एकदा जीवन याच भूमीत मिळावे
खूप शुरवीरांनी दिले या देशासाठी बलिदान
आपणही समृद्ध करुया देऊनी दुसऱ्यांना जीवनदान
आजवर असलेल्या देशाच्या पुरूषप्रधान संस्कृतीचे परिवर्तन करूया महिला सशक्तीकरणानी
महिलांना सुद्धा मिळेल प्रत्येक कार्यक्षेत्रात मोलाचे योगदान
प्रत्येक युवाने जागवावे आपले धाडस
काहीतरी करावे देशासाठी ज्याने दिलेला आहे एवढा मोठा मानस
जो कधी न विझणारा असा हा दिवा
ज्याला तेवत ठेऊया देऊनी आपल्या प्रयत्नांचा ओलावा
