STORYMIRROR

Sonam Thakur

Inspirational

4  

Sonam Thakur

Inspirational

झुंजार स्त्री

झुंजार स्त्री

1 min
506

कितीही येवोत अडथळे त्यातूनही येईन उभारून मी 

कारण मी आहे एक झुंजार स्त्री.......


कितीही करो तिरस्कार माझा 

पण मी हरणार नाही शब्द हा माझा

फिरवत नाही परिस्थितीमध्ये पाठ मी

कारण मी आहे एक झुंजार स्त्री.......


लक्षात ठेवा मी आहे एक हिरकणी

सोडून जात नाही कधी मैदान मी 

झाशीच्या राणीची वंशज मी

मी आहे एक झुंजार स्त्री........


असेल मला खाली पाडण्याचा हेतू जरी तरीही मी ढळणार नाही हरणार नाही 

पुन्हा लढीन मी झुंझेल मी 

कारण मी आहे एक झुंजार स्त्री......


कितीही येवोत अडथळे त्यातूनही येईन उभारून मी 

कारण मी आहे एक झुंजार स्त्री......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational