दिपक
दिपक
दिपक
आता आला दिन हा मंगल
उजळू दिवे सारे सकल !
दिव्यापरी हो कार्य करू या
अंधारात प्रकाश देवू या !
स्वतः जळतो हा दिवा
तया नाही कसला हेवा !
रोज तयाचा प्रकाश नवा
निस्वार्थ ही त्याची सेवा !
सारे जग हे उजळून देई
स्वतः अंधारात राही !
स्वतः जळून दुःख साहून
सुखी होतो प्रकाश देवून !
ज्ञानाचाही दिपक लावा
घडवा हा समाज नवा !
