थंडी...!
थंडी...!


थंडी....!!!!
थंडी आली थंडी पडली
सारी हवा गार गार झाली
दात खीळ आमची बडवू लागली
अंगात साऱ्या हुडहुडी भरली
तोंडातून वाफ चांगलीच बाहेर पडली
पहिली सलामी हा हा करीत झडली
प्रभात फेरी कुड कुडत चालली
कापरा अंगातला उठवू लागली
तो बहाद्दर थंडीस घाबरला वाटते
अजून तरी बाहेर पडला नाही
कदाचित त्याला घराचा चहा
आईने त्याच्या त्याला दिला नाही
रस्त्या कडेला शेकोटीचा पत्ता नाही
उभे साठी कोणताच मार्ग दिसत नाही
आता जरा गर्मी चालण्याने अंगी आली
तेंव्हा कोठे सूर्य देवाची स्वारी अवतरली
झाले एकदाचे आगमन सूर्य देवाचे
घरी परतू लागले घोडे थंडीचे
अंगी ऊब भरता कौतुक वाटले
अंगावर पडणाऱ्या कोवळ्या उन्हाचे
अशी थंडीची सुखद पहाट असावी वाटते
खरेच जेंव्हा ती गुलाबी आठवणींनी नटते
मनात माझ्या आठवणींचे मळभ साठते
थंडीत सुद्धा डोळ्याच्या कडेला पाणी गोठते..!