STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

जय जवान...!

जय जवान...!

1 min
587


जय जवान..!


_ 30°c तापमान....!

1000℃ ची गर्मी.....!

ये समोर

नुसतं नजरेस पड

तुला टिपल्या

शिवाय रहात नाही

अरे नराधमा


या थंडीची

तमा मी बाळगत नाही

माझ्या पवित्र

मायभूमीला कधी

मी नराधमांचा स्पर्शही

करून देत नाही


क्षण भर विश्रांतीही

कधी मी घेत नाही

अंगातली गर्मी

या बर्फ़ालाही

कधी जुमानत नाही


माय भूमीच्या

संरक्षणात

मी कसर काही ठेवत नाही

आतंकवाद

मी कधीच

खपवून घेत नाही


त्याला दिसता क्षणीच

यमसदनास धाडल्यावीना

मी रहात नाही

माझी मला मायभूमी

माझ्या प्राणाहूनही


जास्त प्रिय आहे

हिच्या सेवे साठीच

माझे जीणे

सार्थ होतआहे

खबरदार जर

मला दिसलास तर


आणि खोडी परत

पुन्हा कधी

काढलास तर

चिरडून टाकीन क्षणात


रग पुष्कळ आहे तनात

रागही येतो मनात

उभा चिरीन तुला

आणि बॉर्डर वरच

वाळत घालीन.....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational