STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

3  

Pandit Warade

Inspirational

हिरकणी

हिरकणी

1 min
30.4K


हिरकणी


छत्रपती शिवराय

राहे रायगडावर

ठरलेल्या वेळी होई

बंद किल्ल्याचे ते दार।।१।।


गवळण हिरकणी

दूध विकून निघाली

मध्ये डोंबाऱ्याचा खेळ

पहावया ती थांबली।।२।।


वेळ किती झाला तिथे

नाही तिला समजला

येता लेकराचं ध्यान

जीव तिचा घाबरला।।३।।


बंद दार पाहुनिया

हिरकणी घाबरली

वाट शोधण्या करिता

एका कड्यावर आली।।४।।


जरी अवघड कडा

हिरकणी उतरली

बाळासाठी जिवाचीही

तिने पर्वा नाही केली।।५।।


वार्ता गडावर गेली

राजे अचंबित झाले

घेत सोबत मावळे

त्वरे कड्यापाशी आले।।६।।


तिचा प्रताप पाहून

मान देत गौरविले

तिथे बांधला बुरुज

हिरकणी नांव दिले।।७।।


तैसा प्रताप करती

आज सुध्दा नारी कुणी

तिला गौरवाने आता

संबोधती हिरकणी।।८।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational