STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational

पंढरीची वारी

पंढरीची वारी

1 min
26.4K


पंढरीची वारी। उभा विटेवरी ।

पांडुरंग हरी । शोभतसे ॥ १॥


विठुच्या नामाचा । जयघोष करी ।

जाती वारकरी । दर्शनास ॥ २॥


रूप हो गोजिरे । चंदनाचा टिळा।

तुळशीच्या माळा। गळाहार॥ ३॥


पंढरीची वाट।चाले वारकरी।

धन्य ती पंढरी। पांडुरंग ॥ ४॥


मुखी नाम हरी। जयघोष करी।

कर कटेवरी। ठेवुनिया ॥ ५॥


कपाळी शोभला। चंदनाचा टिळा ।

लावितो लळा। पांडुरंग ॥ ६॥


पंढरीची वारी। लाभली आम्हांस।

सकळ जनास। भाग्यशाली ॥ ७॥


हरीचे हो नाम। अमृता समान।

गाऊ गुणगान। मनातूनी॥ ८॥


भेटी लागी जीवा। तुझीच रे आस।

येतो दर्शनास। धन्य झालो ॥ ९॥


ती टाळ मृदंग । वारकऱ्यासंग।

भजनात दंग। वारकरी॥ १०॥



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational