माल्थस निबंध वर्णन
माल्थस निबंध वर्णन
असे अठरावे ।
शतक मोलाचे ।
कार्य माल्थसचे ।
सुप्रसिद्ध ।।1।।
थॉमस माल्थस ।
आंग्लदेशवासी ।
नाना शास्त्र त्यासी ।
अवगत ।।2।।
परी अर्थशास्त्री ।
निबंध तो थोर ।
लोकसंख्येवर ।
विवेचित ।।3।।
लोकसंख्या वाढ ।
मृत्यूचा हो घास ।
स्वतःच्या नाशास ।
कारण ती ।।4।।
अन्नाची निर्मिती ।
अंकगणितीय ।
वाढे भूमितीय ।
लोकसंख्या ।।5।।
(अंकगणितीय ।
दोन चार सहा ।
आठ पुढे दहा ।
अशी श्रेढी ।।6।।
दोन चार आठ ।
सोळा व बत्तीस ।
भूमितीय तिस ।
श्रेढी म्हणा ।।7।। )
अन्नधान्य वाढो ।
जरी भरपूर ।
तरीही निपुर ।
पडणार ।।8।।
लोकसंख्या वाढे ।
अस्मानी सुल्तानी ।
विघ्ने येति नामी ।
सर्वनाश ।।9।।
सार निबंधाचे ।
नियोजन करा ।
सुरक्षित रहा ।
भविष्यात ।।10।।