Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

आदरणीय गोपिनाथजी मुंडे-पोवाडा

आदरणीय गोपिनाथजी मुंडे-पोवाडा

1 min
14.1K


सलाम गोपिनाथ मुंडे साहेबाला । लोकनेत्याला । आदर्श विचाराला । केंद्रीय मंत्री साहेबाला ।

जन्म झाला ग्रामीण भागात । शेतकरी कुटुंबात । बीड जिल्ह्यात । महाराष्ट्राच्या भूमीत । भारत देशात । जी जी जी


धडाडीचा नेता महाराष्ट्राला । महाराष्ट्र विकासाला । देश विकासाला । गरीबांची जाण नेत्याला ।गरीबांचा वाली महाराष्ट्राला । जीवन बहुजन कार्याला । शेतकरी, कष्टकरी वर्गाला । ग्रामीण भागाच्या विकासाला । जी जी जी


कार्य चाले जन माणसात । गरीबांची तहान, भूक जाणत । खेड्यापाडयाच्या घराघरात। मदतीचा करुनी हात । नेता वसला जनतेच्या हृदयात । लोकांच्या अंतकाळजात । लोकांच्या मनामनात । जी जी जी


संघर्ष त्यांच्या रक्तात । त्यांच्या कार्यात । त्यांच्या जीवनात । त्यांच्या अंगात । आयुष्य लाभले थोडे नेत्याला । उजाळा त्यांच्या आठवणीला । त्यांच्या पवित्र कार्याला । महाराष्ट्राच्या थोर सुपुत्राला । जी जी जी


वाघासारखे ते निडर । नेतृत्व होते खंबीर । शुद्ध वाणीचे त्यांचे विचार । आई वडिलांचे आदर्श संस्कार । विचारांचे मोठे भांडार । आनंदी, समाधानी ,शूर । निर्णय क्षमतेचा असे विचार । जी जी जी


Rate this content
Log in