STORYMIRROR

Manoj Joshi

Inspirational

3  

Manoj Joshi

Inspirational

वडील

वडील

1 min
27K


जाणले म्हणून समजता

जाणलेसे वाटत नाही

जाणून घेतो म्हटले

पण ते ही सोपे नाही

वडील असतातच असे

डोंगर मोठठा की दरी

गोठलेल्या बर्फा खालची नदी

मन कधी कळतात का खरी

दाखवली प्रसंगी कठोरपणा

मनात मात्र असते प्रेम

पाषाणास ही पाझर फूटतो

त्यांच्या ह्रिदयाचा नाही नेम

जसा पारंब्याना आधार वडाचा

तसे वडील हवेतच सगळ्यांना

मनाच्या कोनाड्यात जपून ठेवावे

नाते हवे हवेसे हे सगळ्यांना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational