मन हसले....!!!!
मन हसले....!!!!
अनोळखी मी तुला, तू मला, दूर होते अबोल नाते,
साथ माझी तुला, तुझी मला, अबोल नाते गोड वाटे.
स्पर्श तुझा होताच, शहारतो असा मी,
चिंब-चिंब होतो पावसात.
सुखाची रे चाहूल तू, पाखरांची किलबिल तू,
एकटी नसे मी एकट्यात,
तू हसते अशी, फुलासारखी,
तू दिसे जशी चांदणी नभात.
मन हसले मनातल्या मनात, मन हसले मनातल्या मनात...
सांज-पहाट ही, अन् दिन-रात हे,
सारे काही एकरूप झाले.
अबोल शब्दही झाले बोलके,
परकेपणातूनी प्रेम आले.
जग हे सारे विसरून मी, वाटते असे की,
रहावे तुझाचं पापण्यात,
रंग सारे विसरून मी, प्रेमरंगी रंगून मी,
जपते मी तुलाच या जीवात.
प्रेमगंधातूनी, मग श्वासातूनी,
वाहतेस तू नसानसात.
मन हसले मनातल्या मनात, मन हसले मनातल्या मनात...
