मी कशी...
मी कशी...
मी कशी ?
कधी लालभडक जाळासारखी,
तर कधी जास्वंदी फुलासारखी.
कधी नारिंगी संत्र्याची फोड,आंबट गोड ,प्राजक्तीच्या देठासारखी.
कधी केशरी,संन्यस्त,विरक्त,कर्मठासारखी.
मी कधी पिवळीजर्द हळदी,कधी हिरवीगर्द ओलीचिंब श्रावणी.
मी कधी निळीशार, सूर्यप्रभांकीत,विशाल गगनासारखी.
तर कधी काळीभोर,जीवनांकीत मेघासारखी.
मी कधी पांढरीशुभ्र,उत्साही ओघवती खळाळत्या झर्याच्या फेसासारखी .
तर कधी गुलाबी ,गुढ ,हळुवार ,सांजवेळच्या प्रभेसारखी.
कधी मी,जर्द जांभुळी,मखमली,राजस,ओजस्वी,तेजस्वी ..
मी ही अशी ,
सप्तरंगी इंद्रधनुषी...
