STORYMIRROR

Radhika Chougule

Drama Fantasy Inspirational

2  

Radhika Chougule

Drama Fantasy Inspirational

ओळख स्वतःला

ओळख स्वतःला

1 min
14K


तू नाहीस तो राग

क्षणार्धात राख करणारा

जळणारा जाळणारा...


नाहीस तू सल

कोंडमारा करून मारणारा...


तू विक्षिप्तही नाहीस

स्वतःलाच न कळणारा...


तू आहेस एक जादूगार

ज्याच्यात लपून असतो एक परीस...


जो येतो कधीकधी बाहेर

त्या डाव्या सोंडेच्या कृपेने

आणि हलकेच वाट करून देतो तुझ्यातल्या आनंदाच्या झऱ्याला..


तुझ्या खोल जखमा विरघळून जातात त्या झऱ्यात

सवय करुन दे त्या परीसाला प्रत्येक क्षणाचं सोनं करायची

ओळख स्वतःला ..


नको राहूस भ्रमात तू राग सल विक्षिप्त असल्याच्या...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama