STORYMIRROR

Radhika Chougule

Others

3  

Radhika Chougule

Others

जमवून बघ.. तू सुद्धा

जमवून बघ.. तू सुद्धा

1 min
27.7K


जमवून बघ.. तू सुद्धा


साता जन्माची गाठ बांधली आहेस ,

क्षणभर प्रेमही करुन बघ.


जीवनात खूप काही मिळवायचय,

माझ्या हृदयात मिळालेल कधी कुरवाळून बघ.


चिमूटभर दोषांवर रागावू नकोस,

थोड्या फार गुणांवर एक नजर टाकून बघ.


कष्टाने घाम गाळताना मला विसरू नकोस ,

माझ्या ऊबदार कुशीत थोडं विसावून बघ.


यशाची चव तुझ्या ओठांतून दे,

अपयशाचं दुःख माझ्याच मिठीत विरघळूदे.


माझ्या संगतीने डाव मांडला आहेस ,

माझ्याशी थोssडंस खेळूनही बघ.


मेहनतीच्या घरट्यात हक्क दिलास,

हृदयाच्या गाभाऱ्यात थोडी जागा देऊन बघ.


कधी रुसले तर पाठ फिरवू नकोस ,

तुझ्या ओठांनी ओठांना समजावून बघ.


पहिले वहिले सण रुतु रिते आले रितेच गेले ,

निदान यंदाच्या धुळवडीला तुझ्या रंगात रंगवून बघ.


माझ्या प्रेमार्त तनामनाची धगधग कर्तव्यपूर्तीसाठी शमवू नकोस ,

कधी प्रेमाच्या जाणिवेतून श्वासात श्वास गुंफून बघ.


Rate this content
Log in