STORYMIRROR

Radhika Chougule

Romance Others

3  

Radhika Chougule

Romance Others

पाऊस नि मी

पाऊस नि मी

1 min
25.7K


वाटतंय व्हावं तुझाच एक थेंब

शिरावं ढगात आणि ओतावं प्रेम


कि व्हावं कळी ,लपावं पानांत

फुलायचं गुपित उलगडावं तुझ्याच कानात


नाहीतर.. व्हावं का हिरवं हिरवं पान

तुझ्या थेंबांच्या मोत्यांनी सजवावं सारं रान


किंवा मग व्हावं मी बेधुंद वारा

दूरवर घेऊन जावा तुझ्या थेंबांचा पसारा


होऊन मी कुणीही येईन तुझ्याच जवळ

माझ्यापायी तू मात्र नको होऊस चक्रीवादळ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance