STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

देश आपला .स्फूर्तिगीत

देश आपला .स्फूर्तिगीत

1 min
29.8K


छत्रपतींचा देश आपला

संत, महापुरुषांचा भारत आपला

आदर्श शिकवण संस्कार करण्याला

भारतीय संस्कृती जपण्याला


जुलुम, क्रूरता पाहून आपले

रक्त आता पेटून उठले

शत्रूशी आता लढण्याला

अचूक लक्ष भेदण्याला


धूर्तनितीचा संहार करतो

शत्रूला लढाईची नीति शिकवितो

शत्रूला पळणे भाग पाड़तो

कूटनितीचा संहार करतो


शत्रूला ही आपली वाटते भीती

सैनिक आपले जगात गाजती

शस्र सज्ज आपण सारे

भारताची ताकत विश्वभर


भारतीय जवान देशाची शान

विश्वात मिळतो भव्य सन्मान

विश्वबंधुत्व आपला नारा असे

घातपात आपल्या रक्तात नसे


युद्ध नको पुन्हा विश्वात

हीच निती साऱ्या जगात

नको रक्तपात शिकवण शत्रुस

विश्वशांती मिळो जगास


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational