Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Satish Wadekar

Inspirational

3  

Satish Wadekar

Inspirational

गुरू

गुरू

1 min
13.8K



गुरू

घनघोर काळोखात । प्रकाशाचे गीत गात ।
भेदूनिया काळ रात । सूर्य येतो जसा ।।1।।

अज्ञान अंधारातून । ज्ञानज्योत चेतवून ।
प्रखर मार्गदर्शन । गुरू देतो तसा ।।2।।

वर्षाकाळी कृषिवल । उजवूनी भूमीतल ।
सिंचून निर्मळ जल । धान्य मिळविती ।।3।।

त्याप्रमाणे गुरुजन । प्राण त्यांचा अध्यापन ।
नाना शास्त्रे शिकवून । ज्ञानधन देती ।।4।।

जसा करी घटकार । भिन्न सुबक आकार ।
तसे भविष्य साकार । गुरू प्रसादाने ।।5।।

शिव, ब्रह्मा प्रजापती । वसिष्ठ नि बृहस्पती ।
व्यास आदी हे असती । गुरू जगताचे ।।6।।

शंकराचार्य, चाणक्य । विश्वामित्र, याज्ञवल्क्य ।
सिद्धार्थ गौतम शाक्य । गुरू थोर होते ।।7।।

सॉक्रेटिस आणि प्लेटो । ॲरिस्टॉटल नि लाओ ।
विदेशीचे गुरूरावो । ठरले महान ।।8।।

परी पहा काळगती । बहू शास्त्रे उदयती ।
ज्ञानशाखा विस्तारती । आधुनिक युगी ।।9।।

टागौर, आंबेडकर । कर्वे आणि कर्मवीर ।
आधुनिक गुरू थोर । जोतिबा-सावित्री ।।10।।

- सतीश वाडेकर.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational