STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Inspirational

मौनाची भाषा

मौनाची भाषा

1 min
27.8K


मौनाची भाषा तेंव्हाच कळते

सूर मनीचे जुळावयास हवे ते ....

एक दुःखी दुजा तो सहज टिपतो

अन पाहताक्षणी तो हळहळतो ...


मौनाची ताकद तेंव्हाच कळते

समजून घेणारं हळवं मन असावं लागत ...

मौन म्हणजे परीस,न बोलताही भागतं

हेतू होतो साध्य कधी... कधी होतो विफल


मौन म्हणजे तिरस्कार क्षणिक, राग अनावर

मौन म्हणजे अबोला , नंतरचा वाद विवाद टाळणारा...

समोरच्याला छळणारा ठरतो कधी आनंद देणारा

मौन कधी हटवादी , असहकार कधी सत्याग्रह


मौन हे प्रभावी अस्त्र जरी , नेहमीच कामी येत नाही ...

मौनानेच उद्भवतात अनेक प्रश्न कधी- कधी

मौन वापरावे मिठासारखे आवश्यकतेनुसार

तेव्हांच होईल सिद्ध गड्यानो ! मौन म्हणजे परीस



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational