STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

सटवाईचे लिखाण ..!

सटवाईचे लिखाण ..!

1 min
27.4K


सटवाई कोणाला

माहीत नाही

पण सटवाईला

प्रत्येकजण माहीत आहे


घरा घरात

एकदातरी वडीलधारी

तिचा उधार करतात

आणि काही तरी बोलतात


तुझं नशीब लिहिताना

सटवाई झोपलीती की काय..?

सटवाई नच नशीब लिहिलंय

त्याला आम्ही तरी काय करणार..?


लहान पाणी काही

खरोखरच कळायच नाही

पण सटवाईच महत्व

पण कधी कमी व्हायचं नाही


मानत सदा वाटायचं

आपल्या हाती काहीच नाही

जे नशीब सटवाईन लिहिलंय

तसच जीवनात घडणार


मी आईला विचारायचो

कुठं लिहिते ग ती आपलं नशीब..?

आई म्हणायची अरे

आपलं भाग्य आपल्या कपाळावर लिहिते


मग रोज आरशात

कपाळ ताणून ताणून शोध व्हायचा

पण तीन लिहिलेलं मला

आजवर तरी काही दिसलं नाही


पण आईन अंतःकरणावर

कोरून ठेवलेलं मात्र तसच आहे

ठेविले अनंते तैसेचि रहावे म्हणत

आजपावेतो जीवन जगणे चालू आहे


आईचच मला मोठं नवल वाटत

समाधान म्हणजे काय हे तीन शिकवलं

आणि ते तीन शेवट पर्यंत

अखंडित हृदयीं टिकवल


आता अस वाटत

सटवाईला भेटावं आणि विचारावं

काय काय लिहून ठेवलंस

ते एकदा तरी सांग म्हणावं


आसा विचार करता करता

केंव्हा झोप लागली कळाल नाही

स्वप्नात सटवाई भेटली आणि म्हणाली

तू भाग्यवान नशीबवान आहेस


कारण समाधान हा एकच शब्द

मी तुझ्या कपाळावर लिहिला आहे

ताडकन जागा झालो

प्रसन्न पणे आरशात पाहू लागलो


खरोखरच तीच म्हणणं खर होत

माझ्या चेहऱ्यावर समाधान

आनंदात विलसत होत....!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational