STORYMIRROR

Melcina Tuscano

Inspirational

2.8  

Melcina Tuscano

Inspirational

महाराष्ट्र गौरव

महाराष्ट्र गौरव

1 min
27.7K


ही माय मराठी आमुच्या महाराष्ट्राची

मान उंचाविते अभिमानाने सर्वांची


किती करु कौतुक मी या मराठीचे

संतांनी केलेल्या या पावन भूमीचे


जन्मल्या सावित्रीबाई याच मातीत

अन् केले सर्व मुलींना शिक्षित


मुखी असे अमृतवाणी संत तुकोबांच्या

वीर पराक्रम गाथा आमुच्या शिवाजी महाराजांच्या


साक्षीस आहेत राजा महाराजांचे गड किल्ले

रोवूनी त्यावरी मायभूमीचे ध्वज बिल्ले


सातपुडा, सह्याद्री वाढवी शोभा महाराष्ट्राची

भीमा, कोयना, गोदा खाण त्या पाण्याची


दिसेल खरं सौंदर्य मुलींचं याच मातीत

मराठमोळी मुलगी बघावी खरी नऊवारी साडीत


या मातीतील मराठी पाऊले पुढे पडती

देशोदेशी आता याचे गुणगान गाती


मी मराठी असल्याचा गर्व वाटतो मजला

सलाम करते मी या जन्म दिलेल्या भूमातेला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational