STORYMIRROR

Shreyash Shingre

Inspirational

4  

Shreyash Shingre

Inspirational

साथ तुझी ?

साथ तुझी ?

1 min
526


सावली जशी नेहमी असते सोबत

तशी तूही सोबत असशील का?

स्वप्नांमध्ये गुंतून माझ्या

स्वतःशीच हसशील का?


रोज रोज स्वप्नामध्ये

मला येऊन भेटशील का?

माझ्यासोबत गप्पा मारत

तळ्याकाठी बसशील का?


हातात माझ्या हात घालून

मनसोक्त फिरशील का?

रिमझिमणाऱ्या पावसामध्ये

माझ्यासोबत भिजशील का?


स्वप्नातून उतरून माझ्या

सत्यात कधी येशील का?

असते मनात एकच शंका

कधी तू माझी होशील का?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational