चंद्र आणि त्याची चांदणी
चंद्र आणि त्याची चांदणी


रोज रात्री ताऱ्यांच्या जगात
विहरत असतात ते दोघं,
त्या अवकाशाच्या अथांग पोकळीत
कृष्णविवरासारखं तिचं गूढ मन
तो वाचत असताना
ती हळूच नक्षत्रासारखी हसते,
आणि त्याचं मन झुलू लागतं
ढगांवरती एखाद्या पिसासारखं.
अंगलटीला येणारा वारा आणि
अवकाशातला एक एक तारा वेचत
ढगांवरून चालत जाणारी ती,
त्या गर्द मिट्ट काळोखात
एखाद्या आकाशगंगेप्रमाणे
त्याला भासते.
त्या शांततेत फक्त ते दोघे असतात,
चंद्र आणि त्याची चांदणी