STORYMIRROR

Subhadra Warade

Inspirational

2.5  

Subhadra Warade

Inspirational

ज्ञानज्योति सावित्री

ज्ञानज्योति सावित्री

1 min
522


ज्ञानज्योति सावित्री


ज्ञानज्योति सावित्रीला

करू मुजरा मानाचा

जिने कठीण काळात

दीप लावला ज्ञानाचा ।।१।।


गावो गावी घरोघरी

असो झोपडी राहुटी

पेटविली ज्ञानज्योत

हाती देऊनिया पाटी ।।३।।


शाळा शिकायचे होते

जेव्हा बंधन नारीला

अशा काळी सावित्रीने

झेंडा बंडाचा रोवला ।।२।।


किती संघर्ष करुनि

स्त्रीला बाहेर काढले

रूढी अन्यायी टाकून

धडे स्वातंत्र्याचे दिले ।।४।।


होती सावित्री म्हणून

नारी इथली शिकली

मोठमोठ्या पदावर

आता कार्यरत झाली ।।५।।


भाग्य आमुचे महान

जन्म सावित्रीचा झाला

करू वंदन पहिले

ज्ञानज्योति सावित्रीला ।।६।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational