उंबरठा
उंबरठा
1 min
477
उंबरठा
उंबरठा ओलांडून
घरातून जाता जाता
आठवण येते देवा
तुझी राया जगन्नाथा ।।१।।
कधी नातलगांसाठी
कधी रोजीरोटी साठी
रोज घराच्या बाहेर
वीतभर पोटासाठी ।।२।।
नाही प्रश्न आला कधी
भोळ्या भाबड्या मनात
कोण येतो? उठवितो?
गुज सांगतो कानात ।।३।।
रोज कुणाच्या साथीनं
श्वास अगणित घेतो
ताटातून पोटातले
अन्न कोण पचवितो? ।।४।।
आहे रेखीव मर्यादा
उंबरठा सर्वांसाठी
एक प्रेमाचे बंधन
बांधतसे घरासाठी ।।५।।
जाता जाता कधी एक
मंत्र ध्यानात ठेवावा
देवा साठी उंबरठा
काही वेळ ओलांडावा ।।६।।
