STORYMIRROR

Subhadra Warade

Others

4  

Subhadra Warade

Others

सांज

सांज

1 min
465


सांज


सांज आली अंधारून

बिगी बिगी घरी चला

काम धंदा आटपूनि

पाय बिगीनं उचला ।।१।।


दिसभर काम केले

वेळ झाली विश्रांतीची

मुले घरी सोडलेली

ओढ लागली घराची ।।२।।


गाय निघे परतूनि

तिचे वासरू गोठ्यात

वासराची ओढ लागे

दूध दाटले स्तनात ।।३।।


चिऊ काऊ परतले

दाना चोचीत घेऊन

चिमुकल्या चोचीमध्ये

भरविती वात्सल्यानं ।।४।।


सांज जीवनाची होता

काळजात कळवळा

गाठू अंतिम मुकाम

पाहू विठ्ठल सावळा ।।५।।



Rate this content
Log in