महाराणी पद्मावती
महाराणी पद्मावती
ऐतिहासिक कविता
चित्तोडची राणी पद्मावती
लाखात एक ती देखणी ,
शस्त्रात निपुण, पारंगत
गंधर्वसेन पुत्री असे ती गुणी..!!
रतनसिंह राजाची भार्या
सौंदर्यांची जणू ती खाण ,
अल्लाउद्दीन खिलजी निष्ठूर
झाला फिदा, नसे जाण..!!
पाहण्या उतावीळ झाला
कैद केले रतन राजाला ,
राणी पद्मावती खवळली
खिलजीवर डाव उलटला..!!
अट घालूनी खिलजीला
दासीसह दाखल होईन ,
उतावीळ खिलजी केली मान्य
पद्मावती पोहचली तयार होऊन..!!
युद्ध करून सोडवले राजाला
अपमानित खिलजी खवळला ,
युद्ध पुकारून मारले राजाला
चित्तोड किल्ला मुघलांनी भेदला..!!
पद्मावतीने जागं केलं स्त्रीयांना
सती जाण्याचा डाव तो रचला ,
घातला घोळका किल्ल्याच्या तटाने
अन् खिलजी धावे पद्मवती पहायला..!!
आगीच्या मशाली पेटविल्या
आगीचा डोंब असा उसळविला ,
गेली राणीे आगीत सती होवून
खिलजीवर तिने विजय मिळविला..!!
थक्क होई प्रत्येकजण ते ऐकल्याने
महाराणी पद्मावतीची शौर्यकथा ,
इतिहास घडवला पद्मावतीने
आजही गायली जाते तिची गाथा..!!
प्रणाली कदम, मुंबई
