STORYMIRROR

Pranali Kadam

Tragedy

3  

Pranali Kadam

Tragedy

दहन

दहन

1 min
42

आज माझ्या मनाचा देहांत झाला,

शरीर काया कातळात स्थिरावला!!


मनाची तिरडी बांधून निघालो मी,

पण् स्मशान मार्ग खूपच अंधारला!!


चालता चालता पाय दुःखी झालेत,

अन् मनाचा भार माझ्या खांद्याला!!


उचलावी, आदळावी म्हणतो ती मी,

कारण सगळा त्यानेच तर घात केला!!


वाट पाहतो आहे मी स्मशानद्वाराची,

पण चालताना ठेस लागली पायाला!!


चिता रचून ती, जाळणार स्व हाताने,

जळताना बांध फुटेल का काळजाला?!!


स्थिर नजरेने पाहत राहिलो जळताना,

आगीची धग पकडली होती मनाला!!


जळून ते भस्म झाले, अस्थि ना उरले,

चलावे, निघावे पुन्हा मार्गास मी एकला!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy