लॉकडाऊन
लॉकडाऊन
आज ती थांबली आहे
अनंत काळानंतर,
आज ती शांत आहे....
सर्वांची लाडकी,
सगळ्यांना,
हवीहवीशी वाटणारी!
रोज ओझी वाहून,
घेऊन जाणारी ती
आयुष्यात पहिल्यांदाच,
ती विश्रांती घेत आहे...
अनेकांच्या मनातील
सुखदुःखांची साक्षीदार,
आज ती गुपचूप आहे...
अनेक मृत्यू तिने
डोळ्यांनी पाहिले
तिचा हुंदका तो,
तसाच आतल्याआत
तिने दाबून ठेवला आहे...
तिच्या हातामध्ये
काहीच नसते
ती फक्त!!
आज्ञा पाळत होती...
ती सगळ्यांची
जवळची मैत्रीण,
सगळ्यांना तिचा
खूप अभिमान आहे...
ती जरी बोलत नसली
तरी ती भावना जाणते
सणसूद असो किंवा
दुःखाचा डोंगर,
ती नेहमीच
सवंगड्यांसोबत असते...
त्यांचा हात घट्ट पकडून,
ती त्यांना सुरक्षिततेचं
आश्वासन देते...
ती लोकल, आज
तुम्हा सर्वांचीच तिला
खूप आठवण येते...
खूप एकटी पडली आहे
तिला पण,
सक्त ताकीद दिली आहे
लॉकडाऊन पाळायचं
कुठे बाहेर जायचे नाही...
कधी तुम्हा सर्वांची
भेट होईल, याची ती
प्रतीक्षा करत आहे
तुम्ही सर्वांनी आपली
काळजी घ्या आणि
घरातच राहा!!
असा निरोप,
ती लोकल देते...