STORYMIRROR

Pranali Kadam

Romance

3  

Pranali Kadam

Romance

वचन

वचन

1 min
294

सात वचन दिले मी तुला 

जेव्हा आपला सप्तपदी झाला

आयुष्याची जोडीदार बनून राहीन

आज पुन्हा वचन देते मी तुला....

सातजन्म तुझीच बनून मी राहीन

वचन देते मी तुला

एक बंधन बनून,जे कधीच तुटणार नाही

वचन देते मी तुला.....

सांभाळेल संसार आपुला

जपेन नाती तुझी माझी

प्रत्येक संकटात साथ देईन

प्रत्येक अडचणीत भागीदारी असेल माझी.....

तू माझा अविभाज्य घटक आहे

नाही सोडणार तुला मी वादळात

प्रत्येक वादळ घेईन मी माझ्यावर

तुला ठेवेन जपून मी काळजात.....

अर्धांगिनी मी तुझी झाले

स्वप्नं माझे पूर्ण झाले

तुझ्या जीवनाची भागीदारीण मी

विश्वासाचा गंध दरवळत राहिले.....

जीवनाची दोरी बांधली देवाने

जुळले आपले नाते सातजन्माचे

बायको बनून आली मी आयुष्यात

भरले रंग माझ्या अंतर्मनाचे......

कर सगळ्या गोष्टी तू माझ्याशी

बायको होवून, मैत्रीण होईन मी तुझी

प्रेमाचा स्पर्श देईन तुला मी

प्रेमाचा ओलावा देवून, प्रेमिका होईन मी तुझी....

तुझी मी अर्धांगिणी जन्मांतरीची

माझा तू अर्धांग जन्मांतरीचा

दोघे देवू साथ एकमेकांना,वाद तंटे नको आपल्यात

फुलवू संसार हळूवार स्पर्शाने आपल्या दोघांचा......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance