STORYMIRROR

Pranali Kadam

Romance

3  

Pranali Kadam

Romance

माझी कैफियत

माझी कैफियत

1 min
405

माझी कैफियत तुला 

मी अनेकदा सांगितली,

पण्, तुला ती कळली नाही

अनेकदा वाटलं,

तू माझी कैफियत ऐकावी

पण्, तुला ती जमलीच नाही...

तू फक्त तुझ्यातच मग्न होता

माझ्या सौंदर्याची झळ तुला बसली होती

पण माझी कैफियत तुला दिसत नव्हती.....

बघ एकदा तू माझ्याकडे,

माझ्या नजरेला नजर भिडवून

बघ, तुला काय दिसतं ते.....

कित्येक् रात्र मी जागून काढल्या,

तुझ्या भेटीसाठी मन बंड करून उठतं

पण्, तुला हे मी सांगणार कशी होते....

एक लाजंचा पडदा हमेशा

माझ्या डोळ्यासमोर असायचा....

स्त्री मी, बुरख्यात राहणारी

मनमोकळे उडण्याचा अधिकार, 

कोण देणार होता मला?

म्हणूनच आता मी; मनाशी निश्चय करून,

माझी कैफियत तुला सांगत होते....

ऐक जरा तू, विचार कर;

माझ्या चेहऱ्यावर नाही,

तर माझी कैफियत ऐकून,

मजवरी तू भाळून जा....

हा लाजंचा पडदा फक्त एकदा

बाजूला सारून, मला तू भेटून जा....

डोळ्यांना डोळे भिडवून

मनसोक्त मला पाहून जा

फक्त मला पाहून जा....

माझी कैफियत, तुला भेटण्याची

तुझ्या सोबत राहण्याची, 

ती आस माझी, तू पूर्ण करून जा....

असा दगाबाज नको करू तू

फक्त एकदा ऐक माझे तू

माझी कैफियत ऐकून

तू मजवरी भाळून जा....

एकदा मला तू भेटून जा....

एकदा तू भेटून जा.....

तू भेटून जा....


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ

Similar marathi poem from Romance