STORYMIRROR

Pranali Kadam

Others

3  

Pranali Kadam

Others

आगमन पावसाचे

आगमन पावसाचे

1 min
260


झाले पावसाचे आगमन

दरवळे मातीचा अत्तरी गंध,

मोहरली धरणी, घेतले मिठीत

विरह संपून, आला क्षणात सुगंध..!!


शहारून आले भू अंग 

ढग वाजवी टाळ मृदंग ,

पेटल्या मशाली आकाशात

मेघ झाला पहा नृत्यात दंग..!!


संगीत सोसाट्याचा वारा

वाजे भैर, ढोल, ताशे उत्तुंग ,

जाळ फुफाट सोडत झोत

जणू फुंकियले वाजंत्री शिंग..!!


लवलवली पाऊस झोडिती

वृक्ष लव्हाळे, करी त्व मुकुंद

जमले मेघराजाच्या स्वागतां

झाले सारे सोहळ्यात धुंद


कोरड्या नद्या ओले करून 

खळखळून गाते गीत मधुर,

शेतकरीची काया झळकली

मनी बांधलासे चंग, रंधुर..!!


सरसरली झाडे वेली हर्षून

नाचे धरा, बागडली अंगोपांग,

चौघडा वाजत, शेतं सुखावतील

फिटतील सारे धरतीचे पांग..!!


Rate this content
Log in