STORYMIRROR

Pranali Kadam

Romance

3  

Pranali Kadam

Romance

एका संध्याकाळी

एका संध्याकाळी

1 min
543

एका संध्याकाळी 

नभात रंग भरून आले...

तुझी आठवण येता, 

गाल लाजून लाल झाले....

चाहुल न लागता 

अलगत मनात तू येता,

उगाच मी शहारले...

जेंव्हा तुझा स्पर्श झाला,

तेव्हा मी मोहरून गेले....


एका संध्याकाळी 

डोळे मिटताना,

रात्र चांदण्यात बहरताना;

स्वप्नात तुलाच पाहत होते....

शुक्राच्या नक्षत्रात,

टिपूर चांदणे चमकले...

रातराणीच्या सुगंधाने, 

वाराही बेधुंद झाला.... 

तेंव्हा, लाजाळूच्या पानाने, 

पदर सावरून घेतला होता...


एका संध्याकाळी, 

डोळे मिटताना,

इंद्रधनुष्य रंग उधळून गेले....

त्या सप्त रंगात मीही, 

तुझ्या सोबत; 

सात पावले टाकत गेले....

तुझ्याशी एकरूप होताना,

मागचे सारे मी विसरून गेले....

तुझ्याच हाती मी, 

माझा हात देवून;

सात जन्म मी तुलाच वाहिले....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance