शिर्षक - हर्षली हिरवळ
शिर्षक - हर्षली हिरवळ
नभातून बरसेल
थेंब थेंब पावसाचे ,
धुंद सरींचा श्रावण
छेडील तार शब्दांचे..!!
उन पावसाचा खेळ
करेल श्रावण मास ,
प्रेमाचा वर्षाव करी
श्रावण महिना खास..!!
एक एक थेंब लाज
गाली उमटवी साज ,
तार छेडली पात्याची
सळसळ जशी बाज..!!
उत्तुंग उल्हास रान
बेफाम मोकळे झाले ,
धुंदावल्या त्या दिशाही
बेधुंदीत चाल चाले..!!
हिरवा शालू नेसून
श्रावण हसत आला ,
फुलले सारे अंगण
येईल गोपाल काला..!!
नभाशी नातं भूमीचे
जोडले घट्ट बंधन ,
आला श्रावण घेवून
सोहळा रक्षाबंधन..!!
गोफ विणली नभात
इंद्रधनू पसरलं ,
सुंदर रूप मोहक
श्रावणात बहरलं..!!
रंग चढला खेळाला
श्रावणातल्या सणांचा ,
दोर जोडून नात्यांची
आला सण श्रावणाचा..!!