विषय - पाऊस आणि तो पहिला पाऊस पहिला तो स्पर्श
विषय - पाऊस आणि तो पहिला पाऊस पहिला तो स्पर्श
विषय - पाऊस आणि तो
पहिला पाऊस
पहिला तो स्पर्श ,
मी आणि तू
दोघांचा तो हर्ष..!!
मोहरली कळी
फुलांतला गंध ,
होवून तुझ्यात
झालो मी धुंद..!!
दोघांचा रुसवा
गेला ओलावून ,
मातीच्या गंधाने
प्रेम आले फुलून..!!
पावसाच्या झडी
अंगावर येताना ,
इंद्रधनु छटा आले
प्रेमरंग भरताना..!!
प्रणाली कदम, मुंबई

