भारत
भारत
जय हिंद भारत देशा तुम्हा अमुचा सलाम
केले मुक्त शूरवीरांनी होता इंग्रजांचे गुलाम
लढले शूरवीर, झाली रक्तबंबाळ भारतमाता
होतो नतमस्तक आम्ही, केले त्व भू सुफलाम्
होतो जयघोष लढवय्यांचा, चाफेकर बंधुचा
फासावर भगतसिंग, झाला भारत सुजलाम्
राजगुरू, चंद्रशेखर आझाद घडवला इतिहास
वीर सावरकरांनी भिंतीवर रेखाटले झुंजलाम्
खवळला अरबी समुद्र अन् हिमालय डोंगर
नाद घुमले स्वातंत्र्याचे,अर्ध्य वाहिले भूजलाम्
