STORYMIRROR

Pranali Kadam

Romance Classics

4  

Pranali Kadam

Romance Classics

तुझी आठवण

तुझी आठवण

1 min
2

तुझी आठवण.....

हसता हसता रडवून गेला मला,
गोड आठवणी देऊन गेला मला.
क्षणभर आनंद दिला मनाला,
पण एकटेपणाची सवय लावून गेला मला....


किती सहजपणे मन जिंकून गेला,
प्रत्येक क्षणात रंग भरून गेला.
पण निरोपाची ती वेळ आली तेव्हा,
शब्द न बोलता दूर निघून गेला....


हसण्यात लपलेलं दुःख कळलं नाही,
डोळ्यांतलं पाणी दिसलं नाही कुणाला.
स्वप्नांची रंगीत दुनिया दाखवून,
अचानक दूर निघून गेला तो मला....


मनात अजूनही त्याचे शब्द घुमतात,
आठवणींचे धागे अजूनही जुळतात.
जरी तो आज सोबत नसला,
तरी त्या क्षणांचे रंग अजूनही फुलतात....


कधी हसू येतं त्या दिवसांवर,
कधी डोळे भरून येतात आठवणींवर.
हसता हसता रडवून गेला मला,
हेच सत्य दाखवून हृदय रडवून गेला....


आता त्या वाटांवर एकटीच चालते,
त्याच्या आठवणींना मिठीत घेते.
हसण्याचे ते दिवस आठवले की,
डोळ्यांतून शांतपणे पाऊस झरते....


आजही मन त्याला शोधत असतं,
शांत रात्रींना नावही त्याचं घेतं.
हसता हसता रडवून गेला मला, अन् 
आयुष्याचा धडा देवून गेला मला...


जखम अजूनही ताजी आहे मनात,
तुझं नाव अजूनही आहे श्वासात.
हसता हसता रडवून गेला मला 
तुझी वाट पाहायला शिकवून गेला मला....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance