STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

चिमणी घरटे!

चिमणी घरटे!

1 min
1.4K


चिमणी घरटे.....!!!

नदी काठी वसले

विष्णुपाद मंदिर सूंदर

शोभा वाढवी चंद्रभागेची

काठावरी पंढरपूर

नदी पल्याड पात्रात

शीला शिल्प अद्भुत

कथा पुराणी अनेक

थकले वदून विद्वत्त

चिकाटी पाहून

त्या लहान जीवाची

थक्क झाले


माझे मन

पारणे फिटले डोळ्याचे

पाहुनी शिल्प मातीच्या गोळ्यात

माय माऊली चिमूलकली

खेळ खेळे साकारता तळ्यात मळ्यात

चपळता आणि चिकाटी

पाहता आचम्बित मी जाहलो

छोट्या जीवाची उभारी

डोळे भरून पहात राहिलो


मातीचा कण कण

घेऊन घरटे छान ती उभारते

आपल्या पिलांसाठी

ती अविरत कष्ट उपसते

शिक्षण झाले जीवनाचे

असे माझे क्षणात पूर्ण

खरेच जीवन आपले

असते पिलांसाठी समर्पित

वारी पंढरपूरची


झाली घेऊन बोध कृथार्थ

साधला जाता जाता

असाध्य तो जीवनाचा परमार्थ....!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational