STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

4  

Shila Ambhure

Inspirational

जोडी तुझी माझी

जोडी तुझी माझी

1 min
3.9K


जोडी तुझी माझी

(बालगीत)


जोडी तुझी माझी

किती छान छान

राहु सदा संगे

नको मानपान।।धृ।।


(विटीचे बोल)

जरी मी लहान

माझी तुला साथ

माझ्याविना तू

बोलतो ना बात

लपता जर मी

होतो तू हैराण।।1।।


(दांडूचे बोल)

मैत्रीण तू माझी

दोस्त मी गं तुझा

दूजा कोणावर

नाही भरवसा

तू माझी मी तुझी

आहे खरी शान।।2।।


(दोघे सोबत)

अपुल्या जोडीला

झाली किती वर्ष

संगे राहण्यात

आहे खरा हर्ष

एकसाथ गाऊ

दोसतीचे गान।।3।।

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

एक रचना माझी

शीला अम्भुरे बिनगे

(साद)

परतुर ,जालना



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational