शंभर वर्षे...!
शंभर वर्षे...!


आज शंभर वर्षे झाली
जालियनवाला बागेतील त्या हत्याकांडाला
धार चढली होती
स्वातंत्र्याच्या यज्ञाच्या मोठ्या बंडाला
बलिदान त्यांचे सार्थकी लागता
स्वातंत्र्य मातृभूमिस मिळाले
आठवण होता शाहीदांची
आजही अंतर्मन शहारले
नतमस्तक होउनी ऋण फेडण्या
विनम्र वंदन त्यांचे चरणी करूया
आठवणींस त्यांच्या उजाळा देऊन
बलीदानास त्यांच्या आदारांजली वाहूया...!
विनम्र अभिवादन...!