माय
माय


माय माझी नवरत्नाची खाण
पावसाच्या थेंबाची रुणझुण रिमझिम,
अंतर्यामी मनाची मनकवडी
प्रेम, वात्सल्याची बरसात झिमझीम
मायेचा जागरं करुणेचा पाझरं
सात्विकतेची खाण माय माझी
कातडीचे पदत्राण घातले करुनी तरी
ऋणामधूनी उतराई नाही होणार माझी
दयेची सागर करुणेची घागर
लागे मज जणु बुद्धधाचा अवतार
स्तिथप्रज्ञ होऊन जगतेस जगी
सांभाळून वेदना डोंगराचा भार
अमृताची चव माझ्या मायेच्या हाताला
हिरकणी लेकराची नाही संकटाची पर्वा
अतुल्य ही माया स्वर्ग पडे उणे
कष्टकरी हात चेहरा जसे आनंदाचे लेणे
माय माझी भोळी जशी उन्हाची सावली
पदरमोड करून गाडाभर संसार चालवी
माझ्या मायेच्या नशिबीे खडतर प्रवास
कशी मोजू तिची उंची नाही बसतं पारड्यात
कवयित्री नालंदा वानखेडे
नागपूर
9673788485