Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Mrudula Raje

Inspirational

3.8  

Mrudula Raje

Inspirational

जगन्नाथाचा हात

जगन्नाथाचा हात

1 min
269


राकट हाता, कणखर हाता, हे मजुराच्या हाता |

बलवंत हो, शक्तिवंत हो, तू बन देशाचा कर्ता ||


आकाशाला स्पर्श करावा, अशी क्षमता तुझी |

हात लावता सोने करण्याची, धमक तुझ्या माजी ||


कधी वंगण, कधी माती काळी, हीच तुझी साधने |

हवी कशाला प्रबल पुरुष, नाजूक प्रसाधने ||


छिन्नी-हातोडा, विळा-कोयता, धारदार करवत |

शोभा देती तुझ्या हातांना, करती तुज यशवंत ||


तूच बांधशी उंच इमारती, कारखाने घडविशी |

कधी बांधशी मशिदी, तर कधी देवालये मढविशी ||


जाती-पंथ नको; धर्म तुझा हा, एक श्रमिकाचा |

अविश्रांत करी श्रम, तुझा हा मार्ग मोक्षाचा ||


का जोडावे हात कुणाला ? जर तूच जगन्नाथ |

साऱ्या विश्वाचा लगाम शोभतो तुझ्याच हातात ||


ह्या हातांनी घडव जगाला, घे झेप आभाळी |

नको घाबरू, आज जरी माखली तुज हाताला काजळी ||



Rate this content
Log in