STORYMIRROR

Shakil Jafari

Inspirational

4  

Shakil Jafari

Inspirational

ठेविला हो मान तिरंग्याचा

ठेविला हो मान तिरंग्याचा

1 min
437

देशाचं रक्षण

श्वास अन् श्वासात

एकाच ध्यासात

सीमेवरी !


खाऊनिया गोळ्या

कष्ट ही साहिले

रक्ताने लिहिले

यशोगाथा !


धन्यभाग माना

नांदते शांतता

देशात भद्रता

त्यांच्यामुळे !


देशाचा उत्कर्ष

श्वासानु श्वासात

एकाच ध्यासात

देशप्रेम !


शहीद होऊनी

पांग ही फेडीले

प्राणही अर्पिले

देशासाठी !


जुळतात कर

किती स्वाभिमान

ठेविले हो मान

तिरंग्याचा !


राखले हो त्यांनी

देशाची हो शान

त्यांचा बलिदान

आठवावे !


करत रहावे

नेहमीच वंदन

'शकील' अभिनंदन

सैनिकांना !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational