प्रेम द्यावे प्रेम घ्यावे
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे
प्रेमाच्या गावा जावे
प्रेमाने जग जिंकावे
प्रेमाचे गाणे गावे
सान होऊनी मातेच्या
कुशीत शिरावे
अमृतपान करावे
मोठेपणी प्रियेचे
अधरामृत चाखावे
मित्राच्या प्रेमासाठी
मदिरापान करावे
सीमेवरच्या सैनिकाला
रक्षाबंधन करावे
प्रेम तर सर्वांवर करावे
