STORYMIRROR

Chandan Pawar

Romance

3  

Chandan Pawar

Romance

तारुण्य

तारुण्य

1 min
811

तारुण्याच्या शृंगाराने

दिसतेस तू देखणी ;

तुझे वर्णन करायला

अपुरी पडेल लेखणी .


        मोहक तू सुंदर

         रंग पाडी भूल ;

         कळत नाही फुलासारखी तू

         की तुझ्यासारखं फुल .


चंद्रालाही नाही इतका भाव

जो तुझ्या लावण्याला आहे ;

कसं आठवेल त्याचं नाव

डाग जर त्यावर आहे.


            गोरा गोरा रंग तुझा

            पाठीवर रेशमी वेणी डुले ;

            तुझे मनभावन तारुण्य

            पाहून माझे प्रेमकाव्य फुले.


खळी तुझ्या गालावर

ओठांवर हास्य आहे ;

वैभव तुझ्या दारावर

सुख तुझे दास्य आहे.


            डोळे भरून पाहावे वाटते

            तुझ्या रसरसीत तारुण्याला ;

           बहरत राहवो तुझी

           तारुण्याची बाग क्षणाक्षणाला.


     


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance