राणीचा राजा
राणीचा राजा
माझ्या आयुष्यात येऊन,
कधी प्रेरणा बनला,
तर कधी पाठीराखा बनला,
खर सांगते राजा
आज तु दर्पण बनला,
माझ्या आयुष्यात येऊन,
माझा प्रेमी बनला,
तर कधी जीवन बनला,
खर सांगते राजा,
आज तु माझी कविता बनला,
माझ्या आयुष्यात येऊन,
गोड गोड शब्द बनला,
खर सांगते राजा,
आज तु काव्यातला मोती बनला,
माझ्या आयुष्यात येऊन,
माझा सारथी बनला,
खर सांगते राजा,
आज तु वेड्या राणीचा *राजा* बनला,,,,,

