STORYMIRROR

Sandhya Bhangare

Romance

3  

Sandhya Bhangare

Romance

जोडी

जोडी

1 min
11.4K

तु चंद्र ,

मी लुकलुकनारी चांदणी,

प्रेम असे हे आपले,

धुंद होई रात राणी,


तु साज,

मी वीणा,

सुर असे छेडु,

कोकीळ गाई गाणी,


तु दिवा,

मी तुझी वात,

साथ आपली एक मेका,

उडेज आपला दाही दिशा,


तु हो आत्मा,

मी तुझा श्वास,

प्रेम असे आपले,

जीवन सगळ्यांना देऊ,


तु शब्द ,

मी कवी,

मोडुन सारे बंध,

कविता मी करीन,


तु हो राजा ,

मी तुझी राणी,

हातात हात जीवनभर,

गाऊया प्रेम गाणी,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance