STORYMIRROR

Kalpana Deshmukh

Romance

4  

Kalpana Deshmukh

Romance

प्रीतीच्या सोनपाखरा

प्रीतीच्या सोनपाखरा

1 min
422


प्रीतीच्या सोनपाखरा गाऊ मिलनाचे गाणे

 प्रेम पंख लेवूनी घेऊ उंच नभी उड्डाणे ।।धृ।।


घन दाटून येतांना प्रणयाचे गीत गाते

 हे वेडे मन माझे निशिदिनी तुला शोधते

घुमे प्रीतीचा पारवा तव आगमनाने

दोन शब्द प्रेमाचे बोल मधुर संवादाने ।।१।।


तू घरी नसतांना उदासवाणे होते मन

रिमझिमत्या सरीतून दिसे माझा साजन

सांजवेळ होतांना हुरहूर जीवा लागणे

वाट पहाता दारी नजरेतून शोधणे।।२।।


तू येण्याची चाहूल लागली मम हृदयास

तू दिसताच सख्या रे गंधाळला मंद श्वास

दोन जीवांचा मिलाप होता सूर झंकारणे

सर्वस्व अर्पण करूनी मिठीत सामावणे ।। ३।।


तुझ्या हळुवार स्पर्शाने अंग अंग मोहरले

या प्रीत पावसात सख्या चिंब चिंब न्हाले

विश्वासाचे नाते जिवलगा स्नेह जपणे

नात्यांचे बंध घट्ट विणू रेशीम धाग्याने  ।। ४।।


 प्रीतीच्या सोनपाखरा गाऊ मिलनाचे गाणे

 प्रेमपंख लेवुनी घेऊ उंच नभी उड्डाणे।।धृ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance