STORYMIRROR

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Romance

4  

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Romance

चाहूल (गजल मराठी,,,,,)९/८/२००५

चाहूल (गजल मराठी,,,,,)९/८/२००५

1 min
246

ही तिची चाहूल येते,....ती तिथून विनविते

ती असुनी का.दिसेना? शोध रे.मज खूणविते 


फुल फुल उमलते,तिचेच अश्रू चोरूनी

की ओल्या दहीवरात,ती सुगंध भिंनविते


क्षितिज रेषा छदिते वल्हवित चंद्र नौका

अंग झोकिते तळ्यात आणि मजला भिवविते


छायांच्या महिरापित्त प्रेम रंग भारूनिया

बंसी चे मधुर सूर, ती उन्हात घुमविते


दर्पणास रंग नसे! पवना का स्वरूप असे?

प्रेमही तिचेच तसेच मला रोज शिनवीते.....


गझल होऊनी माझी बिलगते कधी मला

चित्कार ह्या प्रणातील,ती मिठीने दूनविते


लावील ग दृष्ट तुला माझी ही नजर "हाय"

काजली खळून चंद्र, तीट लावं परिनिते..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance