STORYMIRROR

Sanjana Kamat

Romance Inspirational

4  

Sanjana Kamat

Romance Inspirational

प्रेमांकुर(अष्टाक्षरी)

प्रेमांकुर(अष्टाक्षरी)

1 min
255

द्विधा मन लग्न घाट

न्यारा प्राक्तनाचा खेळ

जोडे सासर माहेर

धुंद आसमंत वेळ


सप्त रंगात वसंत

प्रेम विवाह सोहळा

पाठलाग कस्तुरीचा

दोन जीवांचा हिंदोळा


शिंपी आनंद चांदणे

अंतरीची प्रेमरंग

साज शृंगार सजला

स्वप्न भेटी झाली दंग


मनी मधुचंद्र झुले

येई रोमांच शहारा

प्रेमांकुर स्पर्शगंध

मनोहारी प्रेमधारा


कळे सोनं आयुष्याच

वाढे स्नेहवेल थाट

अलौकिक पखरण

चाले कर्तृत्व रहाट


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance